परिस्थितीवर मात करत हिमाचलचा ‘हा’ व्यक्ती न्यूझीलंड सरकारमध्ये बनला मंत्री!; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहतो की एखादा व्यक्ती खूप संघर्ष करून जीवनात आपले नाव कमावतो. चित्रपटातील त्या सर्वच गोष्टी आपल्याला रुचत नाहीत. मात्र, आज तुम्हाला आता एक अशी प्रेरणादायी कथा सांगणार आहोत, जी कोणत्याही चित्रपटातील नसून अगदी खरी आहे.

भारतातील अनेक व्यक्ती जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवत आहे. मग ते राजकारण किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो. हे व्यक्ती त्या त्या क्षेत्रात आपले नाव सक्षम करण्याचा प्रयत्न करत असतात.

या यादीत आता गौरव शर्मा यांनीही आपले नाव जोडले आहे. न्यूटन हॅमिल्टन येथे जनरल डॉक्टरकीचा सराव करणारे गौरव शर्मा हे न्यूझीलंडमध्ये खासदार म्हणून निवडून गेले आहेत. गौरव शर्मा हे मूळचे हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

गौरव शर्मा हे हॅमिल्टन वेस्टमधील लेबर पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. गौरव शर्मा जेव्हा नववीत शिकत होते, तेव्हाच ते आपल्या आई-वडिलांसोबत न्यूझीलंडला निघून गेले होते.

गौरव यांचे वडील हिमाचल प्रदेशातील विद्युत मंडळामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून काम करत होते. त्यांनी या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते न्यूझीलंडला निघून गेले.

एका अहवालानुसार न्यूझीलंडमध्ये सुरवातीचे काही वर्ष शर्मा कुटुंबाला संघर्षाचा सामना करावा लागला. गौरव यांच्या वडिलांनी सहा वर्षांनंतर नोकरी सोडली होती. काही अडचणींमुळे त्यांच्या कुटुंबाला बेघर केले होते. त्यावेळी त्यांनी एका पार्कच्या बेंचवर काही रात्र काढल्या होत्या.

2017 मध्ये गौरव हे काही दौऱ्यानिमित्त शिमल्याला आले होते. तेव्हा त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी जेव्हा हिमाचल प्रदेशात राहत होतो, तेव्हा मला पहाडी भाषा बोलायला आणि तेथील भोजनही आवडायचे. गौरव यांनी ऑकलँड विद्यापीठातुन मेडिसिनमध्ये पदवी घेतली आणि शस्त्रक्रियेचाही अभ्यास केला आहे.

त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातुन बिजनेस अ‌ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली. याचबरोबर गौरव विविध स्तरांवर लेबर पक्षाशीही जोडले गेले होते. 2014 पासून गौरव यांनी तळागाळातील स्वयंसेवक ते आज त्यांनी ही निवडणूक जिंकून मोठे यश संपादन केले आहे.

हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर हे रविवारी गौरव यांचे अभिनंदन करत म्हणाले की, हमीरपूरच्या गालोद येथील डॉक्टर गौरव यांनी राज्याचे आणि देशाचे नाव उंचावले आहे आणि हिमाचल प्रदेशातील लोकांना याचा प्रचंड अभिमान आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीलमध्ये ‘या’ युवा खेळाडूनं अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकत रचला नवा विक्रम!

भारतीय खेळाडूंनी रचला नवा विक्रम! आयपीएलच्या इतिहासात प्रथमच घडली ‘अशी’ गोष्ट

पायल घोष अनुरागनंतर आता ‘या’ बड्या खेळाडूवर गंभीर आरोप करत म्हणाली…

भाजपला मोठा धक्का! एकनाथ खडसे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता अंकिता लोखंडे विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल होणार?