‘या’मुळे बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर होतोय सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई | सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चाललेल्या घडामोडी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.

तसेच त्यासंबंधीचे काही फोटो किंवा व्हिडीओही शेअर करत असतात. परंतू अनेकदा त्यांना कोणत्याना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात.

सध्या देशात कोरोनाची परिस्थीती गंभीर होत चालली आहे. अनेकजण आपल्या परिने मदत देखील करत आहेत. भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी वी यांनी आपल्या 1 हजार कार्यकर्त्यांच्या मदतीनं आतापर्यंत हजारो कोरोना रुग्णांची मदत केली आहे. त्यांनी अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध करुन दिले. ऑक्सिजनसाठी आर्थिक मदत केली. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांमुळं संघर्ष करणाऱ्या रुग्णांना देखील त्यांनी उपचारासाठी मदत केली. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

अशातच बॉलिवूडचा नामांकित अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा फरहान अख्तरनेही श्रीनिवास बी वी यांनी यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मात्र त्याने केलेल्या कौतुकामुळे त्याला सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे.

फरहाने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक आज एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये फरहानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी वी यांचं कौतुक केलं असून त्यांच्या कामाची पद्धत फरहानला फार आवडली असल्याचं दिसून येतं आहे. मी आजवर तुम्हाला भेटलेलो नाही. पण कोरोना संपताच मी नक्कीच तुम्हाला भेटेन आणि तुम्हाला मीठी मारेन, असं त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

परंतू काही नेटकरी त्याने केलेल्या कौतुकामुळे नाराज झाले आहेत. तुला काँग्रेसचीच मदत बरी दिसली, आरएसएसने केलेली मदत नाही दिसली, असं म्हणत फरहानला ट्रोल केलं जातं आहे.

‘श्रीनिवास बी वी यांनी कौतुक करण्यासारखं असं काहीही केलेलं नाही. असे अनेक लोक आहे जे कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता लोकांची मदत करतायेत. अगदी RSS देखील शांतपणे लोकांची मदत करतेय पण त्यांचं कौतुक कधी फरहान अख्तरनं केलं नाही. मात्र काँग्रेसचं कौतुक करण्यासाठी तो पुढे आला.’ तर काही नेटकरी फरहानच्या ट्विटवर असं मत व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या!कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करताना, वजन कमी…

…म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबांनी ट्रेन समोर उडी…

चक्क जावयासोबत सासू गेली पळून, त्यानंतर जे घडलं ते ऐकून…

वाह! ‘वदनी कवल घेता…..’ म्हटल्याशिवाय…

IPL 2021: के. एल. राहूलऐवजी ‘हा’ खेळाडू झाला…

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy