मंत्रालयानंतर सर्व शाळांमध्येही मराठी सक्ती, नवा कायदा तयार करण्याचे काम सुरु

मुंबई | राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणं सक्तीचं करण्यात येणार आहे. येत्या अधिवेशनात याबाबतचा कायदा करणार असल्याची महिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात 25 हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. या ठिकाणी मराठी भाषा शिकवली जात नाही किंवा ऐच्छिक ठेवली जाते. अशा सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवणं सक्तीचं केलं जाणार आहे.

गेल्या सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले पुस्तकांचे गाव, रंगवैखरी इत्यादी उपक्रम यापुढेही सुरू राहतील. भिलार येथे पुस्तकांचे गाव हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याची व्याप्ती वाढवण्याचा शासन प्रयत्न करेल, असं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, रंगभवन येथे मराठी भाषा भवन सुरू केलं जाणार असल्याची माहिती आहे. तसेच ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा दूर करण्यासाठी छोटे सभागृह तयार केलं जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-रेडमीच्या या फोनवर तब्बल तीन हजारांचा डिस्काऊंड! जाणून घ्या या जबरदस्त फोनचे फिचर्स…

-बदल्यावर बदल्या; तुकाराम मुंढेंची बदली नागपूर महापालिका आयुक्तपदी 

-महापरिक्षा पोर्टल रद्द होणारच; काँग्रेसचं विद्यार्थ्यांना आश्वासन

-आमदार मनीषा कायंदेंचा मोदी भक्तांना खडा सवाल; म्हणाल्या, असं करायला तुमची मजबुरी तरी काय?

-चॅलेंज स्विकारलं तर 2 वर्षात बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण होईल… अशक्य काही नाही- शरद पवार