“चव्हाणांच्या दाव्याने खळखळ किंवा खळबळ होण्याचं कारण नाही”

मुंबई | चव्हाण यांच्या दाव्याने फारशी खळखळ आणि खळबळ होण्याचं कारण नाही. चव्हाणांचा दावा मुंबईच्या सौम्य थंड हवेत वाहून गेला, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच शिवसेनेनं भाजपचा देखील जोरदार समाचार घेतला आहे.

2014 साली एक विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपला रोखण्यासाठी आघाडी स्थापन करण्याचा शिवसेनेचा विचार होता. त्या दृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्याशी संपर्क साधला होता, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

शिवसेनेनं किंवा राष्ट्रवादीने यावर गांभीर्याने मत व्यक्त केल्याचं दिसत नाही, पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा इतक्या गांभीर्याने घेतला की दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत विझलेली चिलीम फुंकण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असं म्हणत शिवसेनेनं भाजवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या- 

-मंत्रालयानंतर सर्व शाळांमध्येही मराठी सक्ती, नवा कायदा तयार करण्याचे काम सुरु

-रेडमीच्या या फोनवर तब्बल तीन हजारांचा डिस्काऊंड! जाणून घ्या या जबरदस्त फोनचे फिचर्स…

-बदल्यावर बदल्या; तुकाराम मुंढेंची बदली नागपूर महापालिका आयुक्तपदी 

-महापरिक्षा पोर्टल रद्द होणारच; काँग्रेसचं विद्यार्थ्यांना आश्वासन

-आमदार मनीषा कायंदेंचा मोदी भक्तांना खडा सवाल; म्हणाल्या, असं करायला तुमची मजबुरी तरी काय?