रितेशच्या ‘त्या’ व्हिडीओ वरून जेनेलियाने केली त्याची चांगलीचं धुलाई, पाहा व्हिडीओ

मुंबई| हिंदी चिञपट सृष्टीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा-देशमुख. ते दोघं सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावर रितेश मजेशीर व्हिडीओ करण्यापासून ते सद्य परिस्थितीवर परखडपणे भाष्य करत असतो.

जेनेलिया सुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच रितेशसोबत आणि तिच्या मुलांसोबत खेळताना, मस्ती करतनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच जेनेलियाने एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये जेनेलीयाला राग आलाय असं दिसतय.

बऱ्याच दिवसांपूर्वी रितेश आणि जेनेलियाचा एका पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये ते दोघं फोटोसाठी पोज देताना अचानक आणखी एक अभिनेञी येते. तेव्हा तो तिच्या जवळ जातो आणि गप्पा मारतो.  तेव्हा जेनेलियाचा चेहरा अगदी पाहण्यासारखा असतो. त्या दोघांचा हा व्हिडिओ जुना जरी असला तरी सोशल मीडियावर अजून बघितला जातोय.

नुकत्याचं जेनेलियाने शेअर केलेल्या या व्हिडिओत रितेश आणि जेनेलिया फोटोसाठी पोज देताना अचानक प्रिती झिंटा येते. प्रिती आणि रीतेश एकमेकांसोबत छान गप्पा मारतात. नंतर तो प्रितीच्या हाताच चुंबन घेतो. या गप्पा जेनेलिया ऐकत आहे आणि त्याचाकडे रागाने बघताना दिसते. आणि त्या व्हिडिओनंतर सध्या हाताला लागलेलं असलेल्या जेनेलियाचा चिडलेला चेहरा समोर येतो. ज्यात ती जोरजोरात हाताने बुक्की मारताना दिसते. त्यानंतर रितेश समोर सोफ्यावर घायाळ होऊन पडल्याचा अभिनय करतो.

व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘राम-लखन’ या चिञपटातील ‘तेरा नाम लिया… तुझे याद किया…’हे गाणं चालु आहे. यात जेनेलिया रितेशला मारत आहे आणि तो तिची माफी मागताना दिसतोय.

या व्हिडिओमधील जेनेलियेच्या हावभावाला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली. तसेच यातील दोघांचा कॉमेडीचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाचं पसंतीस पडला असून चाहते यावर कमेंटस् आणि लाईक्स्चा चांगलाच पाऊस पाडत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

महत्वाच्या बातम्या-