पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

सांगली | सांगली कोल्हापुरात महापूर आला आणि त्या महापूराने होत्याच नव्हतं करून टाकलं. सांगलीच्या पूरग्रस्त भागाची युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा आणि अडचणी समजावून घेतल्या आणि त्यानंतर केलेल्या भाषणात पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी आणि त्याबरोबरच सरकारने घोषित केलेल्या मदतीत वाढ करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

अंकली, हरिपूर सांगलीसह जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागात जाऊन त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. आदित्य ठाकरेंनी हरिपूर इथल्या हळदीच्या पेवांची आणि शेतीची पाहणी केली.

महापुराचा सांगली जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. सांगली कोल्हापुरकांचे अतोनात हाल झाले आहेत. त्याबरोबरच पूरग्रस्तांचं मोठं नुकसान झालं आहे. म्हणूनच पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेल्या मदतीत आणखीन वाढ करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मी मुंबईत गेल्यावर पूरग्रस्तांची व्यथा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. त्यांच्या व्यथा आणि अडीअडचणी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, असंही आदित्य यावेळी म्हणाले.

पूरग्रस्तांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोणतीही लक्षणं दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार घ्यावा. पूरग्रस्तांना जर मदत मिळत नसेल तर त्यांनी शिवसेनेला सांगावं. त्यांना आमच्या माध्यमातून मदत पोहचवली जाईल, अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांनी काम केलंय तर महाजनादेश यात्रा काढण्याची गरजच काय?; धनंजय मुंडेंची सडकून टीका

-यु ब्रॉडबॅन्डची इंटरनेट सेवा… पुणेकर म्हणतात नको रे देवा….!

-शिवसेना प्रवेशांच्या चर्चांवर खासदार सुनिल तटकरे संतापले; म्हणतात…

-पी. चिदंबरम यांच्या बचावासाठी राहुल- प्रियांका मैदानात!

-वाढदिवशीच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप करणार???