कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांनी कसं पकडलं? संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद; पाहा व्हिडिओ

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुं.ड गजानन मारणे याचं नाव सतत चर्चेत आहे. गजानन मारणेची तळोजा का.रागृ.हातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करत तळोजा ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणूकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

यावेळी रॅलीदरम्यान गजा मारणेवर अनेक गु.न्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे अ.टकेच्या भीतीने गजा मारणे फरार झाला होता. तेव्हापासून पुणे पोलिस गजा मारणेच्या मागावर होते. मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला गजो मारणे जास्त दिवस पोलिसांना गुंगारा देऊ शकला नाही. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मेढा गावामध्ये गजा मारणे असल्याची पोलिसांना माहीती मिळाली होती. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अमोल जाधव आणि त्यांच्या टीमने गजा मारणेला पुन्हा अ.टक केलं आहे.

गजा मारणेला पोलिसांनी कशाप्रकारे आपल्या जाळ्यात अडकवला, याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर खूप जास्त व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मेढा पोलिसांनी गजा मारणेला पकडण्यासाठी संपूर्ण ट्रॅप लावला होता. पोलिस रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करत आहेत. अशातच एका गाडीवर पोलिसांना संशय येतो. पोलिस त्या गाडीची नीट तपासणी करतात तेव्हा त्या गाडीत पोलिसांना कुख्यात गुंड गजा मारणे आढळतो.

 

दरम्यान, गजानन मारणे दोन खुनांच्या ख.टल्यातून सुटल्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत साधारण तीनशेच्या आसपास चारचाकींचा ताफा करत मारणे पुण्यात आला होता. याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे त्यांनी कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावून दिल्याचं समोर आलं होतं.

कोरोनाच्या परिस्थितीतही कोणत्याही नियमांचे पालन न करता गजानन मारणेनं मिरवणूक काढली. कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावून मारणे आणि त्याच्या साथीदारांवर दह.शत पसरविल्यानं त्यांच्यावर पोलिसांनी गु.न्हा दाखल केला होता.

फटाके फोडून तब्बल 300 वाहनांच्या ताफ्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण करत ही मिरवणूक काढण्यात आली होती. माध्यमांनी या गु.न्हेगा.ॉरीच्या उदात्तीकरणावर टीकेची झोड उठवताच पोलिसांनी गजानन मारणेवर गु.न्हा दाखल केला होता.

महत्वाच्या बातम्या –

ग्राहकांसाठी खुशखबर! सहा महिन्यांत सोनं तब्बल 22 टक्क्यांनी घसरलं; वाचा आजचे दर

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार? मुख्यमंत्री म्हणाले…

डेलकर प्रकरणाला धक्कादायक वळण! ‘या’ व्यक्तीने डेलकरांकडे 25 कोटींंची खंडणी मागितली

ऐन निवडणुकीच्या काळात ममता बॅनर्जींवर ह.ल्ला? प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा!

…अन् भर चौकात पोलिसांनी तिच्या कानशिलात वाजवली; पाहा व्हिडिओ