नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत सतत चढउतार पहायला मिऴत आहे. अलिकडे अमेरिकन इक्विटी बाजारात बिटकॉइनच्या किंमती वाढल्यामुळे सोन्या-चांदीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. यामुऴे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आता ही एक चांगली संधी मानली जात आहे.
गेल्यावर्षी सोन्याच्या किंमती उच्च पातळीवर गेल्या होत्या. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं सुमारे 57 हजार रुपये प्रती तोळ्यावर पोहचलं होतं. मात्र, आता सोनं उच्चांकी पातळीवरुन जवळपास 22 टक्क्यांनी खाली आलं आहे.
सध्या सोन्याची किंमत 44 हजार 680 रुपये प्रती तोळा इतकी आहे. गेल्या वर्षी सोन्याच्या दरात तीव्र वाढ झाली होती. मात्र. यावर्षी त्यात घट होत आहे. अभ्यासकांच्या मते ही घट काही काळापूरतीच असेल. थोड्या दिवसांंत पुन्हा सोन्याच्या किंंमतीत वाढ पहायला मिळेल.
दरम्यान, मोदी सरकार सोन्याच्या बाबतीत लवकरंच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.
संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.
अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जाऊ तशी सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.
देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.
महत्वाच्या बातम्या –
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार? मुख्यमंत्री म्हणाले…
डेलकर प्रकरणाला धक्कादायक वळण! ‘या’ व्यक्तीने डेलकरांकडे 25 कोटींंची खंडणी मागितली
ऐन निवडणुकीच्या काळात ममता बॅनर्जींवर ह.ल्ला? प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा!
…अन् भर चौकात पोलिसांनी तिच्या कानशिलात वाजवली; पाहा व्हिडिओ
‘या’ कारणामुळे 60 वर्ष आजोबांचा विजेच्या खांबावर चढून गोंधळ