“…म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री सोडून वर्षा बंगल्यावर जाणार नाहीत”

मुंबई | मुख्यमंत्री राज्याचा कारभार त्यांचे खासगी निवसस्थान असणाऱ्या मातोश्री बंगल्यावरुनच चालवतात. मात्र यावरुनच आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंना ही भीती आहे की केंद्र सरकारचे किंवा पवार साहेबांचे हेर त्याठिकाणी वर्षा बंगल्यावर असतील. आतल्या गोष्टी बाहेर जातील आणि मग ठाकरेंचे व्यवहार कळतील. त्या भीतीने उद्धव ठाकरे मातोश्री सोडणार नाही, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

वर्षा बंगल्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासन, पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्याच्या बातमीचा आधार घेत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी अशाप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

 

महत्वाच्या बातम्या-

-“चिंता नसावी, महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे, मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही”

-जे करायला नको तेच केलं; महाराजावर गुन्हा दाखल

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सुट्टी नाहीच!

-#CoronaVirus I ‘त्या’ 11 जणांना बाहेर न पडण्याच्या सूचना

-#Corona | स्वत:च डोकं वापरुन औषध घेऊ नका; अजित पवारांचं आवाहन