अधिकारी असावा तर असा…! तहसीलदाराने पूरग्रस्तांसाठी डोक्यावर उचलल्या तांदळाच्या गोण्या

कर्नाटक :  महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये शेकडो लोकांचे बळी गेले असुन अनेकजण बेपत्ता आहेत. लाखो लोकांचे संसार वाहून गेले आहेत. या महापुरामध्ये कर्नाटकमधील एका तहसीलदाराची माणुसकी पहायला मिळाली. गणपती शास्त्री असे या तहसीलदाचे नाव आहे.

पद, प्रतिष्ठा विसरून गणपती शास्त्री यांनी चक्क आपल्या डोक्यावर तांदळाचे पोते नेऊन पूरग्रस्तांना दिले. त्यांच्या या कामाचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसून येत आहे.

गणपती शास्त्री हे बेल्थानगडी येथील तहसीलदार आहेत. त्यांनी केलेल्या अनेक कामांंमुळे ते जनतेसाठी नेहमी हिरो राहिलेले आहेत.

पुरग्रस्त आलेल्या भागात एका तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या पुलावरून गणपती शास्त्री मार्ग काढत गावातील लोकांना अन्नधान्य घेऊन गेले. त्यांच्या या कामगिरीमुळे तेथील पुरग्रस्तांनी त्यांचे आभार तर मानलेचं पण त्यांच्याकडे पाहून पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

महापुरामुळे अनेकजण बेघर झालेले आहेत. त्यामुळे अनेक हात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा कलम 370 ला विरोध पण ‘या’ कारणास्तव केली मोदींची स्तुती!

-मोदी सरकारचा वेडेपणा थांबणार तरी कधी??; राहुल गांधी भडकले

-सुनील तटकरेंना मोठा धक्का; ‘या’ कट्टर समर्थकानं केला शिवसेनेत प्रवेश

-पूरग्रस्तांना गायी, म्हशी द्या; महेश लांडगेंचं दहिहंडी आणि गणेश मंडळांना आवाहन

-बाळासाहेबांमुळे गिरणी कामगाराचा मुलगा मुख्यमंत्री झाला- नारायण राणे