मुंबई | ‘तुला पाहते रे’ या मालिकेनेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री गायत्री दातार आता एक रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी युवा या वाहिनीवर 11 डिसेंबरपासून ‘युवा डान्सिंग क्वीन’ हा कार्यक्रम सुरू होतोय. यामध्ये गायत्री सहभागी होणार आहे.
‘तुला पाहते रे’ या मालिकेने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. या मालिकेत गायत्रीने साकारलेली ईशा निमकर ही भूमिका चांगलीच भाव खावून गेली. तिची बोलण्याची पद्धत तीचे काही डायलॉग आजही जसेच्या तसे लोकांना आठवतात. ‘दो रुपये भी बहोत बडी चीज होती है बाबू’ या डायलॉगमुळे ती साकारत असलेलं पात्र अधिकच उठावदार बनलं.
गायत्रीने याआधी कधीच डान्स स्पर्धेत स्पर्धेत भाग घेतलेला नाही. वेस्टर्न, फोक, क्लासिकल आणि अजून वेगवेगळ्या डान्सफॉर्म असणारा युवा डान्सिंग क्वीन या सेलिब्रेटींचा डान्सिंग रिऍलिटी शो विषयी तीला विचारण्यात आलं. तेव्हा मात्र तिने लगेच या शोला आपला होकार कळवला.
दरम्यान, गायत्रीने साकारलेली ईशा निमकर प्रचंड लोकप्रिय झाली. तसेच तिचा डान्स प्रेक्षांकाच्या किती पसंतीस उतरतो, हे पहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या-
पंजाब महाराष्ट्र बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव आलाय- जयंत पाटील https://t.co/cM0Hsb1DtM @Jayant_R_Patil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
“लेकीचा पराभव झाल्यानेच एकनाथ खडसे भाजपवर टीका करतायेत” https://t.co/V68a0DBX5b @EknathKhadseBJP @Rohini_khadse @BJP4Maharashtra @MPSanjayKakade
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
“सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटलेत” – https://t.co/3geZXUgqGn @dhananjay_munde @Dev_Fadnavis @Avadhutwaghbjp @BJP4Maharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019