पंजाब महाराष्ट्र बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव आलाय- जयंत पाटील

मुंबई |  पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव आला आहे, अशी माहिती ठाकरे सरकारमधील विद्यमान मंत्री जयंत पाटील यांनी आज दिली.

पीएमसी बँकेतील4  हजार 355 कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर आर्थिक कात्रीत सापडलेल्या या बँकेचे सामान्य खातेधारक हवालदील झाले आहेत. या खातेधारकांना न्याय देण्यासाठी या बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण व्हावे, असा आमचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

गरज भासल्यास पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या विलीनीकरणाबाबत आम्ही रिझर्व्ह बँकेशीही चर्चा करणार आहोत, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. पीएमसी बँकेतला घोटाळा उघड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादले आहेत. या बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने उचललेल्या या पावलाने आता दोन्ही बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-