जेटलींचं देशासाठीचं योगदान कायम स्मरणात राहिल-सोनिया गांधी

नवी दिल्ली | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यांचं शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

अरुण जेटली यांच्या अकाली निधनाबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जेटली यांनी सार्वजनिक जीवनात दिलेलं योगदान कायमस्वरुपी लक्षात राहिल, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी जेटलींना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्या खांद्यावर अर्थमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती. परंतु त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. 

महत्वाच्या बातम्या-