युतीबाबत बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही- गिरीश महाजन

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलीये. दोन चार दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात युतीच्या जागावाटपावर आणखीही तोडगा निघत नाहीये. दोन्ही पक्षांनी अनेक जागांवर आपापला दावा सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. त्यावर युतीबद्दल बोलण्याचा अधिकार तीन लोकांनाच आहे. युतीबद्दल बोलण्याचा बाकी कुणालाही अधिकार नाही, असं प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्रीफडणवीस या तीन व्यक्तीनांच युतीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल, असं महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

लवकरच जागावाटपाची आणि युतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर काही दिवसांपूर्वी उद्धव यांनी पंतप्रधानांच्या उपस्थित युती होणार असल्यां जाहीर केलं होतं.

दोन्ही पक्षांना आपापल्या महत्वकांक्षा असल्याने माघार कुणीच घेत नाहीये. अशात जागावाटपाच्या मुद्द्यावरून युतीत पुन्हा एकदा तु तु-मैं मैं होण्याची शक्यता आहे. सेना-भाजपमध्ये गेले काही दिवस तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-