… म्हणून मोदींच्या सभेत पिशव्यांना बंदी!

नाशिक | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये सभा आहे. या सभेत गोंधळ होऊ नये याची खबरदारी म्हणून सभेच्या ठिकाणी कांदा किंवा अन्य शेतमालाशी संबंधीत कोणतीही वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. याचबरोबर पिशव्या न्यायलाही मज्जाव करण्यात आला आहे.

परदेशी कांद्याची आयात सरकारने करू. परदेशी कांदा मागवल्यास त्याचा परिणाम इथल्या शेतकऱ्यांवर होतो. त्यामुळे पाकिस्तान, चीन किंवा इतर देशातून कांद्याची आयात करू नये, अशी नाशिकमधल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. 

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नाशिकमध्ये होती. त्यावेळीही शेतकऱ्यांचा असंतोष पहायला मिळाला. 

मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी आणि काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या र‌ॅलीवर कांदे फेकण्याचा आणि त्यांची यात्रा रोखण्याचा इशारा दिला होता. मात्र आदल्या दिवशीच काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर काहींना स्थानबद्ध केलं. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. 

पंतप्रधान मोदीची सभा पंचवटीतील तपोवनमधल्या साधुग्राम मैदानावर होत असलेल्या सभेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मैदानाला आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. पोलीस महासंचालक या सगळअयापरिस्थितीकडे जातीने लक्ष ठेवून आहे.

महत्वाच्या बातम्या-