आमदारांना घरं देण्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या- राजू पाटील

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत 300 घरे देणार असल्याचं जाहीर केलं.

आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आता यावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदारांना मोफत घरे कशासाठी? असा सवाल करत घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईत सर्वपक्षीय आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी 300 घरं देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

सरकार डळमळीत असल्याने आमिष म्हणून आमदारांना घरं द्यायची आहे का? सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांना फुकटची घरं का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मुख्यमंत्रीही असे मिळालेत की ज्यांना…’; निलेश राणेंनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली 

सर्वात मोठी बातमी! ईडीचा शिवसेनेला दुसरा झटका; ‘या’ नेत्याची संपत्ती जप्त 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक गंभीर आरोप 

…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं! 

सावधान! Omicron BA.2 व्हेरिअंटची दोन लक्षणं आली समोर, दिसताच डॉक्टरांकडे जा