“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे ‘जनता कर्फ्यूचं’ आवाहन केलं आहे त्याला सगळ्यांनी 100 टक्के प्रतिसाद द्या”

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे त्या जनता कर्फ्यूला सगळ्यांनी 100 टक्के प्रतिसाद द्यावा, असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.

रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्या अनुषंगाने रक्तदान कऱण्याचं आवाहनही म्हैसेकर यांनी केलं आहे. ब्लड बँकांसोबत बैठक घेतली त्यानंतर रक्तसाठा कमी असल्याचं समजलं आहे. असं असलं तरीही त्या ठिकाणी गर्दी करु नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती जर बाहेर आढळल्या तर त्यांचा व्हिडीओ काढून आम्हाला पाठवा. त्यांच्याशी वाद किंवा भांडण करु नका, असंही म्हैसेकर यांनी म्हटलं आहे.

करोना विरोधातला लढा हा विषाणू विरुद्ध माणसाचा लढा आहे. त्यासाठी माणसांनी सगळे मतभेद विसरुन एकत्र यायला हवं असंही म्हैसेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-कोरोनाची लागण झाली कनिकाला, पण चिंता वाढली नेतेमंडळींची!

-पार्थ पवार सिंगापूरहून आले का?; अजित पवारांचं ‘दादा’ शैलीत उत्तर!

-राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करा- देवेंद्र फडणवीस

-मी पण घरी आहे, तुम्ही पण घराबाहेर पडू नका- इंदोरीकर महाराज

-मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही थुंकोबांना भरावा लागणार भुर्दंड; महापौरांनी घेतला निर्णय