लखनऊ| बॉलिवूडची गायिका कनिका कपूरला कोरोना झाल्याचं आज आलेल्या तपासणी अहवालातून स्पष्ट झालं आहे. कनिका काही दिवसांपूर्वी लंडनहून परतली आहे. त्यानंतर तीने 3-4 पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती आणि तिथे ती 300 ते 400 जणांना भेटली होती. यामध्ये 2 खासदारांचा समावेश होता.
या कार्यक्रमात काही नेतेमंडळींचादेखील समावेश होता. यामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिरंजीव भाजपा खासदार दुष्यंत सिंह हे देखील या पार्टीला गेले होते. त्यानंतर ते संसदेतही हजर राहिले होते. तिथे अनेकांना भेटले. अगदी, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येही ते गेले होते. त्यामुळे कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचं उघड होताच, संसदेत धाकधूक वाढली आहे. दुष्यंत सिंह क्वारंटाईनमध्ये असून आपण सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचं ट्विट वसुंधरा राजे यांनी केलंय.
कनिकानं गेल्या चार दिवसापूर्वी आपल्याला फ्ल्यु झाला असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तीने कोरोनाची तपासणी केली आणि तीला कोरोनाची लागण झाली आहे तीने स्वत; इंन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
तिच्या कुटुंबाला क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपण इतरांप्रमाणे विमानतळावर तपासणीही केली होती असं तिनं यावेळी सांगितलं आहे.
कुछ दिन पहले दुष्यंत और उनके ससुराल वालों के साथ मैं लखनऊ में एक डिनर पर गयी थी। कनिका कपूर, जो कि #Covid19 संक्रमित पाई गई हैं, वें भी उस डिनर में बतौर अतिथि मौजूद थीं।
सावधानी के तौर पर मैं और दुष्यंत सेल्फ़-आइसोलेशन में हैं और हम सभी आवश्यक निर्देशों का पालन कर रहे हैं।
— Vasundhara Raje (@VasundharaBJP) March 20, 2020
महत्वाच्या बातम्या –
-पार्थ पवार सिंगापूरहून आले का?; अजित पवारांचं ‘दादा’ शैलीत उत्तर!
-राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करा- देवेंद्र फडणवीस
-मी पण घरी आहे, तुम्ही पण घराबाहेर पडू नका- इंदोरीकर महाराज
-मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही थुंकोबांना भरावा लागणार भुर्दंड; महापौरांनी घेतला निर्णय
-तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर परस्थिती बिघडू शकते- तुकाराम मुंढे