पाकिस्तानला निघून जावं; ‘हा’ अभिनेता आझम खानवर भडकला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कमाल रशिद खान हा नेहमी वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतो. त्याने यावेळी राजकारणावर भाष्य करणारं ट्वीट केलं आहे. त्याचं ट्वीट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे.

कमाल रशिद खानला केआरके या नावाने ओळखलं जातं. कमालने केलेल्या ट्वीटवर नेटकऱ्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.

जर आझम खान यांना फाळणीच्यावेळी पाकिस्तानमध्ये जाता न आल्याचं दु:ख असेल तर त्यांनी आता खुशाल जावं मी स्वत: त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची बिझनेस क्लासचे तिकीट काढून देण्यास तयार आहे, असं म्हणत केआरकेने समाजवादीचे नेते आझम खान यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

मुसलमान 1947 नंतरही शिक्षा भोगत आहेत. फाळणीच्या वेळी मुस्लिम पाकिस्तानमध्ये गेले असते तर त्यांना शिक्षा भोगावी लागली नसती. ते भारतात आहेत तर त्यांना शिक्षा भोगावीच लागणार आहे, असं आझम खान एका मुलाखतीत बोलले होते. या वक्तव्यावर केआरकेने ट्वीटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर आझम खान यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर केआरकेने केलेल्या ट्वीटची प्रशंसा केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राणेसाहेब… पराभवाची हॅट्रीक चुकवायची असेल तर निवडणूक लढवू नका; शिवसेनेचा सल्ला

-कर’नाटकावर’ उद्धव ठाकरेंचा सामनातून हल्लाबोल; म्हणतात…

“भाजपचा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही”

-काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???

-जोर का झटका जरा धीरेसे देऊ; भाजपचे मंत्री आणि आमदार आमच्या संपर्कात- नाना पटोले