मुंबई | आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळत होती. त्यानंतर सोन्याच्या किंमतीने (Gold Silver Today Rate) आभाळ गाठलं आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या झळा आता भारतीय बाजारात तसेच जागतिक बाजारावर देखील होताना दिसत आहे. रशियाने युद्धाची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढू लागल्या होत्या.
आज सोन्या चांदीच्या दरात 500 रूपयांची वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार 2021 मध्ये सोन्याच्या दरात 3.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 53,700 रुपयांवर पोहोचला आहे.
ऐन लग्नसराईत 3 दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत तब्बल तीन हजारांची वाढ झाल्याचं दिसतंय. 26 फेब्रुवारी रोजी सोन्याची किंमत 50 हजार 700 वर होती. आता त्यात 3 हजाराची भर पडली आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या 9 दिवसात चांदीच्या दरात 6200 रूपयांची वाढ झाली आहे.
26 फेब्रुवारी रोजी चांदीची किंमत प्रति किलो 65 हजार 500 वर होती. आता त्यात चांदीची किंमत 69 हजारावर गेली आहे. सोमवारी चांदीच्या दरात 700 रूपयांची वाढ झाली होती.
दरम्यान, कोरोना काळात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. त्यावेळी सोन्याने 54 हजाराचा आकडा गाठला होता. त्यानंतर आता पुन्हा सोन्याची किंमत 54 हजाराच्यावर जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं ‘या’ तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी
आत्ताची सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर
“…तर अजित दादांना फासावर लटकवाल का?”
‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा भडकले
“ईडीची चिंता तुम्ही करू नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर…”