मोठी बातमी! मंत्री नवाब मलिकांना न्यायालयाचा धक्का

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं.

सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर मलिकांना आता न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मात्र, यादरम्यान त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आलं.

चौकशीला वेळ न मिळाल्याचं कारण देत ईडी कोठडी वाढवण्याची मागणी ईडीकडून करण्यात आली होती. त्यावेळी मलिकांना आणखी 7 मार्चपर्यंत ईडीची कोठडी वाढवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता.

अशातच आता मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

21 मार्चपर्यंत मलिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, आता त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. मलिकांचे वकिल त्यांच्या जामीनासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.

नवाब मलिक यांचे बंधु कप्तान मलिक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पक्षाचे नेते आणि कुटुंबातील लोकांसोबत बसून विचारविनिमय करुन पुढं काय करायचंय याचा निर्णय घेऊ, असं म्हटलं आहे.

दरम्यान, मलिकांना कोणतीही नोटीस न बजावता अटक करण्यात आली होती. मलिकांना जामीन मिळाल्यानंतर ते सविस्तर बोलतीलच, असंही कप्तान मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

आत्ताची सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर

“…तर अजित दादांना फासावर लटकवाल का?”

‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा भडकले 

“ईडीची चिंता तुम्ही करू नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर…” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत