सोने पे सुहागा! ऐन लग्नाच्या सिझनमध्ये सोनं आणखी उतरलं; वाचा आजचा दर

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल आहे. भारतातील लोकांला सोन्याच्या असलेल्या चाहतीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. सोन्याबरोबरंच चांदीच्या दरात देखील घट पाहायला मिळत आहे. अशातच सध्या लग्नकार्य सुरु आहेत. यामुळे दागिने तयार करु ईच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी माणली जात आहे.

सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 701 रुपये प्रती तोळा आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर जवळपास 56 हजार 200 रुपये प्रती तोळ्यावर गेले होते. सध्या उच्चांकी दरापेक्षा सोनं तब्बल 11 हजार 500 रुपयांनी कमी झालं आहे. हे दर येत्या काळात आणखी उतरु शकतात, असं बोललं जात आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याच्या बाबतीत लवकरंच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जाऊ तशी सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

535 भागांचा टप्पा पूर्ण करून ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

लाईव्ह कार्यक्रमातच गेस्टवर पडला टीव्ही स्टुडिओचा सेट, पुढे…

सकाळी दरवाजा उघडताच समोर दिसले दोन सिंह अन् मग…; पाहा…

लहान पण देगा देवा! ‘ती’ गोष्ट पहिल्यांदाच…

‘अत्यंत घाण भाषेत कलाकार सुद्धा…’, ‘हा’ अभिनेता…