सलाम! हॉस्पिटलला आग लागली तरी देखील डॉक्टर रुग्णाची सर्जरी करतच राहिले; पाहा व्हिडीओ

मॉस्को | रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा माणून प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांसाठी सदैव तत्पर असतात. वेळोवेळी आपल्याला देखील याचा अनुभव आलाच असेल. जणू रुग्णसेवेचं व्रत घेऊनच प्रत्येक डॉक्टर आपलं काम पार पाडत असतात.

डॉक्टर स्वतःचे प्रा.ण जरी संकटात आले तरी देखील रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी तयार असतात. अशीच काहीशी घटना मॉस्कोतील ब्लॉगोवेशचेंस्क शहरात घडली आहे. येथील एका हॉस्पिटलला आग लागली तरी देखील डॉक्टर रुग्णाची सर्जरी करत राहिले. स्वतःचा जीव वाचवून अखेर डॉक्टरांनी रुग्णाचा जीव वाचवला आहे.

ब्लॉगोवेशचेंस्क शहरातील एका रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर अचानक आग लागली होती. मात्र, त्याचवेळी रुग्णालयात डॉक्टरांची एक टीम पेशंटची सर्जरी करत होती. या रुग्णाची ओपन हर्ट सर्जरी चालू होती. यावेळी अनेक डॉक्टर्स आणि नर्सेस ऑपरेशन थिएटरमध्ये होते.

रुग्णालयात आग लागल्याने हॉस्पिटलमध्ये सर्वांची एकंच धांदल उडाली. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी रास्ता मिळेल तिकडे पळू लागले. मात्र, ऑपरेशन थिएटर मधील एकही व्यक्ती जागेवरून हलला नाही.

अग्निशमन दलाचे जवान संपूर्ण मेहनतीने हॉस्पिटलला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. डॉक्टर्स मात्र रुग्णाच्या सर्जरीमध्ये व्यस्त होते. कारण जर या डॉक्टरांनी स्वतःच्या जिवाची पर्वा करत रुग्णाला तसंच सोडलं असतं किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला असता तर रुग्णाचा जीव धो.क्यात आला असता. रुग्णावर मृ.त्यू देखील ओढावण्याची शक्यता होती.

या कारणाने आगीतून वाचण्यासाठी पळून जाण्यापेक्षा डॉक्टरांनी रुग्णाचा जीव वाचवण्यास महत्व दिलं. डॉक्टरांनी हे ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण देखील केलं. सध्या जगभरातील लोक या डॉक्टरांचं कौतुक करत आहेत.

रुग्णाचं ऑपरेशन करणारे डॉक्टर वलेन्टीन फिलाटोव्ह म्हणाले की, हे एक हृदयाचं ऑपरेशन होतं. आम्ही दुसरं काहीच करू शकत नव्हतो. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवायचा होता. रुग्णाला आम्ही असं सोडूच शकत नव्हतो.

दरम्यान, सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रुग्णालयाच्या वरच्या बाजूला आग लागलेली आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. तसेच रुग्णालयात पेशंटची सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांचा एक फोटो देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोने पे सुहागा! ऐन लग्नाच्या सिझनमध्ये सोनं आणखी उतरलं; वाचा आजचा दर

535 भागांचा टप्पा पूर्ण करून ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

लाईव्ह कार्यक्रमातच गेस्टवर पडला टीव्ही स्टुडिओचा सेट, पुढे…

सकाळी दरवाजा उघडताच समोर दिसले दोन सिंह अन् मग…; पाहा…

लहान पण देगा देवा! ‘ती’ गोष्ट पहिल्यांदाच…