मुंबई | सणासुदीचा हंगाम सुरु झाला असून नागरिकांमध्ये खरेदीचा कल जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
सणासुदीच्या मुहुर्तावर भारतीय सोनं खरेदीवर जास्त भर देताना दिसतात. सोनं ही एक उत्तम गुंतवणूक असल्यानं त्याच्यावर जास्त भर आहे.
भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे तसेच चांदीचे दर काहीसे घटताना दिसत आहे. मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने घट सुरुच आहे.
आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोनं 48 रुपयांनी स्वस्त झालं आहे. या घसरणीसह आज सोन्याचा दर 51485.00 वर ट्रेड करत आहे.
चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. चांदीच्या दरात किरकोळ 5 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह चांदीचा भाव 66300.00 रुपयांवर ट्रेड करत आहे.
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
महत्त्वाच्या बातम्या –
“शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार भाजपच्या संपर्कात”
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“पोलिसांनी राज ठाकरे यांना बेड्या ठोकाव्यात”