सोन्याचा आजचा भाव, तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी सोनं महागलं, वाचा ताजे दर

एक उत्त्म गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहे. सोन्याच्या कमी जास्त भावांमुळे सोनं खरेदी करणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर झालं आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात 12 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती घसरली होती. अमेरिकन इक्विटी बाजारात बिटकाॅइनच्या किमती वाढल्यानं सोन्या-चांदीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं होतं.

स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या भावात तेजी पहायला मिळाली. अर्थसंकल्पानंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेने  कमाॅडीटी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झालेली पहायला मिळाली आहे.  सोन्याचा भाव 47339 रुपये असून त्यात 21 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.

चांदीविषयी बोलायचं झालं तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या सोमवारी चांदीच्या किंमतीमध्ये देखील वाढ पहायला मिळाली. चांदीचा एक किलो भाव 69994 रुपये झाला असून चांदीमध्ये 828 रुपयांची वाढ पहायला मिळाली. चांदीनं आज 70241 रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

good returns या वेबसाईटनुसार सोमवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46000 रुपये झाला आहे. यामध्ये 340 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 47000 रुपये झाला. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46400 रुपये झाला आहे. 24 कॅरेटसाठी तो 50620 रुपये झाला आहे. कोलकत्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46620 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 49420 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट 44570 रुपये झाला आहे. 24 कॅरेटसाठी तो 48630 रुपये आहे.

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात चढउतार पहायला मिऴत आहे. अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत रुपया कमकुवत आहे. दूसरीकडे लसीकणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम वर्तवण्यात येत आहे. सोन्याचांदीच्या चढउतारामुळे खरेदीवर फारसा काही फरक पडणार नाही. कारण भारतात सोनं खरेदीला जास्त वाव आहे. लोकं सोनं खरेदी करण्याचं काही बंद करणार नाही.

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?

राज कुंद्राने सांगितलं बेडरूम मधील ‘ते’ सिक्रेट, शिल्पा झाली शॉक; पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! अवघ्या 23 वर्षांची महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांचं आहे स्वप्न

बाबो! चालू सामन्यात रोहितने लगावली पंतच्या श्रीमुखात, पाहा व्हिडीओ

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर आमदार महेश लांडगे म्हणतात…