Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोनं चांदीच्या किंमतीवर होतोय.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव वाढलेले होते. आज बुधवारी कमॉडिटी बाजारात मोठी घट पहायला मिळालं आहे.

एमसीएक्सवर आज मंगळवारी सोन्याचा भावामध्ये 125 रूपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51,509 रुपये इतका आहे.

चांदीच्या भावामध्ये आज जवळपास 248 रुपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 67,344 रुपये झाला आहे.

गेल्या काही आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1,900 डॉलर प्रति औंस वाढला आहे. तसेच, स्पॉट गोल्डचा भाव 1886.63 डॉलर प्रती औंस झाला आहे.

दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोनं चांदीच्या किंमतीवर होताना दिसत आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात देखील चढ उतार होताना दिसतोय. त्यामुळे येत्या काळात सोनं स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

IAS Tina Dabi Marriage: प्रेमापासून ते तलाकपर्यंत, अशी होती टीना-अतहरची लव स्टोरी

 “आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”

Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा

काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…

 Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज