IAS Tina Dabi Marriage: प्रेमापासून ते तलाकपर्यंत, अशी होती टीना-अतहरची लव स्टोरी

जयपूर |  युपीएससी टाॅपर (UPSC Topper) आणि राजस्थान केडरची आयएएस अधिकारी टीना दाबी (Tina Dabi) सातत्यानं चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील टीना पोस्ट करत असते.

टीना दाबी 2015 च्या युपीएससी बॅचची आयएएस अधिकारी आहे. पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं काश्मिरच्या अतहर खानसोबत लव्ह मॅरेज केलं होतं.

2016 मध्ये मसुरीत पहिल्यांदा टीना आणि अतहरची भेट झाली होती. त्यानंतर सातत्यानं दोघांमध्ये भेटणं आणि बोलणं चालू झालं. परिणामी मैत्री ही प्रेमात बदलली.

एका कार्यक्रमात टीनानं अतहरबद्दल सांगितलं होतं. पहिल्याच नजरेत अतहरवर प्रेम झालं. त्याच्या अभ्यासावर आणि चातुर्याचं तिला कौतुक वाटत असल्याचंही टीना अनेकदा म्हणाली होती.

दोघांनाही राजस्थान केडर मिळालं पण काही वर्षातच दोघांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर त्यांनी अखेर घटस्फोट घेतला. त्यानंतर आता टीनानं एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

टीना दाबी आता राजस्थान केडरच्या आयएएस अधिकाऱ्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रदिप गवांडेसोबत टीना लग्न करणार आहे.

टीनाने प्रदीप सोबतचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. ओ मुस्कान ओढ रही हु जो तुमने दी है, अशा प्रकारचं कॅप्शन टीनानं दिलं आहे.

टीना सध्या फायनान्स विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहे. टीनानं प्रदीपसोबतच्या नात्याबाबत सर्वांना सांगितलं आहे.

टीना आणि अतहरच्या लग्नानंतर टीनाला विविध गोष्टींवरून टीका सहन करावी लागली होती. लव्ह जिहादचा मुद्दा देखील उचलला गेला होता.

दरम्यान, टीनासोबतच्या तलाकनंतर अतहर खाननं आपलं केडर बदलून काश्मीरमध्ये काम करणं पसंत केलं. त्यानंतर दोघांच्या नात्याचा शेवट झाला.

पाहा पोस्ट – 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

महत्त्वाच्या बातम्या – 

 “आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”

Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा

काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…

 Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं”