“तिथं आमची गफलत झाली, 10 वर्ष सत्ता भोगल्यानं…”; सुशीलकुमार शिंदेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | 2014 साली देशात सत्ताबदल झाला. मोदी लाटेत काँग्रेससह सर्व स्थानिक पक्ष लाटेत वाहून गेले. त्यानंतर 2019 मध्ये देखील भाजपने जलवा कायम ठेवत पुन्हा केंद्रात सत्ता मिळवली.

याच काळात काँग्रेसला उतरती कळा लागली. एकमागून एक दिग्गज नेते निवडणुकीत पराभूत झाले. नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं.

अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2014 नंतर भाजपला आक्रमक प्रचार करणारा मोदी सारखा नेता मिळाला. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

मोदींनी सैन्यासाठी सोलापूरातून कपडे घेतले जातील असं प्रचारसभेत सांगितलं होतं. मात्र एक ही रुपयाचा कपडा देखील त्यांनी घेतला नाही. खोट्या प्रचाराला लोक भुलले, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली, असं शिंदे यावेळी म्हणाले आहेत. अशी मी पक्षावर थेट टीका करू शकणार नाही, असंही ते म्हणाले.

10 वर्ष सत्ता भोगल्याने आम्ही देशाच्या राजकारणात अॅक्टीव नव्हतो. त्यामुळे संघटना बांधनात आम्ही कमी पडलो. एकट्या राहुल गांधींना दोष देणं योग्य नाही, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, पक्षात खळखळत पाणी हवं असतं. लोकांना बदल हवा असतो, असं सुचक वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

IAS Tina Dabi Marriage: प्रेमापासून ते तलाकपर्यंत, अशी होती टीना-अतहरची लव स्टोरी

 “आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”

Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा

काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…