Bappi Lahiri | इतक्या कोटींची संपत्ती आपल्या मागे सोडून गेले बप्पी लाहिरी

मुंबई | ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचं निधन झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलंय. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

1980 च्या दशकात आपल्या संगीत आणि गाण्यांद्वारे लोकांची मने जिंकणाऱ्या बप्पी लाहिरी यांनी डिस्को डान्सर, शराबी आणि नमक हलाल यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये गाणी गायली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत बप्पी लाहिरी यांनी भाजपच्या तिकिटावर श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी आपल्या मालमत्तेची माहिती देताना बप्पी दा यांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे 754 ग्रॅम सोने आणि 4.62 किलो चांदी आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेला तपशील 2014 मधील आहे. त्या गोष्टीला जवळपास 7 वर्षे झाली आहेत. बप्पी दा यांची एकूण संपत्ती 20 कोटी आहे. बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. ते बंगाली ब्राह्मण कुटुंबातील होते.

बप्पी लाहिरी हे अशा गायकांपैकी एक आहेत ज्यांनी भारताला डिस्कोची ओळख करून दिली. बप्पी दा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी अमेरिकन पॉप स्टार एल्विस प्रेस्लीपासून खूप प्रभावित होतो. पॉपस्टार एल्विस प्रेस्लीने त्याच्या कॉन्सर्टमध्ये सोन्याची चेन घातली होती

एल्विस प्रेस्लीला पाहिल्यानंतर मला वाटायचं की, जेव्हा मी एक यशस्वी व्यक्ती बनेन, तेव्हा मी स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार करेन, असंही त्यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं.

प्रेस्लीपासून प्रेरित होऊन, मी सोनेरी परिधान करतो आणि ते माझ्यासाठी भाग्यवान आहे. अलीकडेच त्यांनी LA मध्ये ‘दमदम मस्तकलंदर’ नावाचं एक गाणं रेकॉर्ड केलं आहे, शीर्ष पॉप गायिका ज्युलिया प्राइससोबत.

महत्वाच्या बातम्या-   

Bappi Lahiri | ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन!

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा