खुशखबर! आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

मुंबई | भारतीयांसाठी सोनं म्हणजे जीव की प्राण आहे. सोनं घालून मिरवणं एवढंच नाही तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून भारतातील लोक सोन्याला प्राधान्य देतात. सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेले काही दिवस भारतात सोन्याच्या मागणीत सातत्याने चढउतार अनुभवायला मिळाली आहे. आणखी काही दिवस सोन्याच्या दरात अशीच चढउतार राहिल असे अभ्यासक बोलत आहेत. अशातच आज सोन्याच्या दरात मोठी घट अनुभवायला मिळाली आहे.

एमसीएक्सवर आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 550 रुपयांची घट पाहायला मिळाली आहे. 550 रुपयांच्या घटीसह आज एमसीएक्सवर सोन्याच्या दर 46 हजार 780 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे.

सोन्यासह आज चांदीच्या दरात देखील घट अनुभवायला मिळाली आहे. चांदीच्या दरात आज किलोमागे 600 रुपयांची घट झाली आहे. 600 रुपयांच्या घटीसह एमसीएक्सवर आज चांदीचा दर 62 हजार 800 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये सोने-चांदीचे दर खूप खाली उतरले होते. मात्र, येत्या काही दिवसांत सोने-चांदीचे दर वाढतील असे अनेक अभ्यासक बोलत आहेत. यामुळे साने-चांदी खरेदी करण्याची हीच संधी मानली जात आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो.

या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

महत्वाच्या बातम्या-

फराह खानने सलमान खान बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली…

पती राज कुंद्रासाठी शिल्पाचा अनोखा नवस, घोड्यावर बसून देवीच्या दर्शनाला

…म्हणून भर ऑफिसमध्ये बहिणीनेच बहिणीला धो धो धुतलं, पाहा व्हिडीओ

वर्षभर सेक्स न करताही गर्भवती राहिली तरुणी? पोटदुखीमागे डॉक्टरांनी सांगितलं गजब कारण

मोठ्या बसला ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ