मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! आता किराणा दुकांनामध्ये वाईन मिळणार

मुंबई | कोरोनाच्या काळात सरकारचा महसुल मोठ्या प्रमाणात घटला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार अनेक गोष्टींवरचा कर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही गोष्टींवरील कर वाढवण्याचा निर्णय सुद्धा सरकार घेत आहे.

अशातच आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.  मागील काही दिवसांपासून हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता, असं मलिक यांनी सांगितलं आहे.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. 1000 चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

पुढच्या वर्षापर्यंत वाईनचा उद्योग विस्तार तब्बल 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचं देखील मलिकांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्या आपल्या राज्यात दरवर्षी तब्बल 70 लाख बाॅटलची विक्री होत असते. सरकारनं या निर्णयानंतर आता तब्बल 1 कोटी बाॅटलची विक्री होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी

टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता

मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”

 “तो फोटो कुणी काढला?, हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा”