अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; केली ‘ही’ नवी घोषणा

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी स पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे.

सुप्रसिद्ध गायक शान अर्थात शांतनू मुखर्जीसोबत एक डुएट रोमँटिग साँग त्या गाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.

पंडित ललित यांचं संगीत, संजय चेल यांचे गीत आणि पटकथा असणारा हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात म्हणजे पुढच्याच महिन्यात रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

अमृता फडणवीसांनी या चित्रपटाच्या टीमसोबतचे फोटो ट्वीटमध्ये शेअर केले आहेत. हे गाणं विनोदी राजकीय टिप्पणी असणारा आगामी चित्रपट ‘लव्ह यू लोकतंत्र’ मधील आहे. हा चित्रपट आणि त्याचं संगीत ऑगस्ट 2022 मध्ये रिलीज होणार आहे, असं या अमृता फडणवीसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या गणेशोत्सव काळातही अमृता यांनी एक गाणं चाहत्याच्या भेटीसाठी आणलं होतं. गणेश वंदना असं या गाण्याचं नाव होतं. तर, या गाण्यातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला होता.

भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश गाण्यातून देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली होती. त्यामुळं आता या नवीन गाण्यातून अमृता फडणवीस कोणता सामाजिक संदेश देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“हवेत उडणाऱ्या भाजपच्या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल” 

“आजपासून भाजपच्या अध:पतनाला सुरुवात झालीये” 

राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! 

एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या गोटात खळबळ