सर्वसामान्यांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता

मुंबई | कोरोना काळात मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी मागील वर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने वाढत वाढत आता शंभरी पार केली आहे. तर दुसरीकडे एलपीजीच्या किंमतीने देखील ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. या इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस मात्र आर्थिक कचाट्यात सापडल्याचं दिसतंय.

ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पेट्रोलचे दर 5 रूपयांनी कमी करण्यात आले होते.

त्याचबरोबर डिझेलच्या दरात देखील 10 रूपयांची घट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता पेट्रोल आणि डिझेल पुन्हा स्वस्त होणार असल्याची चिन्हे आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील तेलाच्या किंमतीवर दिसणार आहे. केंद्र सरकार याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रसार झाल्यामुळे लॉकडाऊनची शक्यता आहे. त्यामुळे मागणीत घट झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीला मोठा धक्का बसणार आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती जर कमी झाल्या तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होतात. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 7 आठवड्याच्या निच्चांकी पातळीवर आहे.

जागतिक बाजारात ब्रेंट आणि यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिजीएटच्या दरात मोठी घट झाल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, इंधन दरवाढीवरून जनता रोष व्यक्त करत असताना केंद्र सरकार कोणत्याही प्रकारचे ठोस पावलं उचलताना पहायला नव्हतं.

त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“राज्यात सत्ताबदल होणार, नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार”

शरद पवारांसारखं चंद्रकांत पाटलांनीही केलं भरपावसात भाषण, पाहा व्हिडीओ

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घट; वाचा कारण

मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीकडून भाजपला दे धक्का

‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगणा राणावतला मोठा झटका, आता…