सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ सर्वांना बोनस मिळणार

नवी दिल्ली | दिवाळीच्या तोंडावर सरकारी कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निमलष्करी दलांना 30 दिवसांचा दिवाळी बोनस दिला जाणार आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली.

अर्थ मंत्रालयाच्या मते, केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलांच्या पात्र कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ दिला जाईल. या व्यतिरिक्त केंद्रशासित प्रदेशातील त्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळेल, जे केंद्र सरकारच्या इमोल्युमेंट्सच्या पॅटर्नचे अनुसरण करतात आणि केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही बोनसद्वारे संरक्षित नाहीत.

बोनसचा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल, जे 31 मार्च 2021 रोजी सेवेत होते आणि 2020-21 वर्षात किमान सहा महिने सतत सेवेत होते. यामध्ये 6 महिने ते एक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच प्रमाणात बोनस दिला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए आणि डीआर पुन्हा 3 टक्क्यांनी वाढू शकतो. यासह केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा डीए आणि डीआर मूळ वेतनाच्या 28 टक्क्यांवरून 31 टक्के होईल.

डीए आणि डीआरमध्ये वाढ करण्याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना इतर काही फायदे देखील मिळतील, ज्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक पेन्शनची मर्यादा 45000 रुपयांवरून 1.25 लाख रुपये करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”

“अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो”

“देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या आणि जेवण घ्या”

आज 1 वाजता लागणार इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परिक्षांचा निकाल!

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठा बदल, पाहा आजचा दर