मुंबई | गेल्या दोन वर्षापासून कोरोना (Corona) महामारीने थैमान घातल्यामुळे सर्वांना मास्कचा वापर करावा लागत आहे. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशातच ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने कोरोनावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता मास्क घालणं देखील ऐच्छिक करण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी माहिती दिली आहे.
यासोबतच राज्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठीही आरोग्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ठाकरे सरकारने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना गुडीपाडव्याच्या आधी गिफ्ट दिलं आहे.
निरोगी राहण्यासाठी आवश्यक किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण या सर्व चाचण्या करण्याची मान्यता दिल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
50 ते 60 आणि निवृत्तीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी अशाप्रकारच्या चाचण्या करुन घेणं बंधनकारक केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, 105 कोटी रुपयांचा खर्च शासकीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोनातून करण्यात येणार आहे. 5 हजार रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च सरकार उचलणार असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ आदेश
Raj Thackeray: “आठवावे रुप…हिंदूस्वरुप!”, राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा टीझर रिलीज
Coffee Benefits: काॅफी प्या मस्त रहा! कॉफी पिणाऱ्यांना ‘या’ आजारांचा कमी धोका
Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…
“आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”