पुणे | काही वेळापूर्वीच राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता बाहेर फिरताना मास्क घालणं किंवा न घालणं ऐच्छिक असणार आहे. अशातच आता मास्क तोंडावरून उतरला असला तरी डोक्यावरचा भार (helmet compulsion) कमी झाल्याचं दिसत नाही.
पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्ती होणार आहे. येत्या 1 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे.
शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्वांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद काम करणाऱ्या दुचाकीचालक कर्मचार्यांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आलंय.
4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे असणार आहे. त्यामुळे आता पुणेकर या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Raj Thackeray: “आठवावे रुप…हिंदूस्वरुप!”, राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा टीझर रिलीज
Coffee Benefits: काॅफी प्या मस्त रहा! कॉफी पिणाऱ्यांना ‘या’ आजारांचा कमी धोका
Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…
“आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”
आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…