रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार ‘इतका’ बोनस

नवी दिल्ली | सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेच्या सुमारे 11.56 लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराइतकेच बोनस मिळतील.

रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी बोनस देत असतं. गेल्या वर्षी देखील कोरोना संकटाच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळाला होता. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना 17,951 रुपये बोनस म्हणून मिळाले. यापूर्वी सरकारने भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली होती.

कोल इंडिया लि. ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी त्याच्या सर्व नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडरच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रति कर्मचारी 2500 च्या कामगिरीशी संबंधित बक्षीस जाहीर केलंय. महारत्न कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे की, 11 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी कामगिरीवर आधारित बक्षीस दिलं जाईल.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन विभागांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, यावर्षीही रेल्वेच्या राजपत्रित नसलेल्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल. यासाठी सुमारे 1,985 कोटी रुपये खर्च केले जातील, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! मुंगूस सोडून साप ‘या’ प्राण्यासमोरही पडतो गार, पाहा व्हिडीओ

सोनं घेणाऱ्यांसाठी सुर्वण संधी, वाचा आजचा सोन्याचा दर

ऐटीत सिंहाला गोंजरायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

नवरा-बायकोने केला ‘हा’ अनोखा स्टंट, पाहा व्हायरल व्हिडीओ

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा ताजा भाव