काय सांगता! मुंगूस सोडून साप ‘या’ प्राण्यासमोरही पडतो गार, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, काही लोकांना प्राण्यांविषयी जाणून घ्यायला खूप आवडते. तर दुसरीकडे अशी लोक आहेत की त्यांच्यासमोर एखाद्या प्रण्याचं नाव जरी काढलं तरी त्यांना अंगावर काटा येतो.

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात.

त्यामध्ये कधी प्राण्यांची हाणामारी असते, तर कधी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतो. तर अशातच सोशल मीडियावर याच संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये चक्क एक साप एका खारूताईसमोर माघार घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे. यापूर्वी आपल्याला वाटायचं की, साप फक्त मुंगसालाच घाबरतो परंतू या व्हिडीओमधून असं दिसून येतं आहे की साप खारू ताईलाही घाबरत आहे.

जंगलामध्ये एका ठिकाणी लहानशी खारूताई चक्क एका सापासमोर भारी पडत आहे. त्या दोघांमध्ये चांगलंच युद्ध सुरू आहे. परंतू आश्चर्याची बाब म्हणजे शेवटी खारू ताईने त्या सापावर विजय मिळवला असल्याचं पाहायला मिळतं.

त्यांचा हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोनं घेणाऱ्यांसाठी सुर्वण संधी, वाचा आजचा सोन्याचा दर

ऐटीत सिंहाला गोंजरायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

नवरा-बायकोने केला ‘हा’ अनोखा स्टंट, पाहा व्हायरल व्हिडीओ

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा ताजा भाव

भाजपला शह देण्यासाठी ‘या’ शहरात पवारांच्या तीन पिढ्या उतरल्या मैदानात!