मुंबई | बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांची प्रेम कहाणी संपूर्ण जगाला माहिती आहे. सोशल मीडियावर देखील ही जोडी हिट आहे.
रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पहायला मिळतं. अनेकदा वेगवेगळे रिल्स शेअर करत दोघं नेटकऱ्यांची करमणूक करत असतात.
रिल्समुळे अनेकदा दोघंही एकमेकांची खिल्ली उडवतात. अशातच आता जेनेलियाने एक पोस्ट शेअर करत खुशखबर दिली आहे.
एका फोटोत रितेश आणि जिनिलिया दोघेही बेबी बंपसोबत दिसत आहेत. जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केल्यानं आता चर्चेला उधाण आलंय.
पोस्टमध्ये रितेश बेबी बंपसोबत दिसत आहे. रितेश आणि जिनिलियाचा आगामी चित्रपट असल्याचं त्यातून कळतंय. चित्रपटाचे नाव ‘मिस्टर मम्मी’ असं आहे.
चित्रपट नेमका कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्यामुळे आता रितेश आणि जेनेलियाचे चाहते त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहे.
दरम्यान, लवकरच तो अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात रितेश दिसणार आहे. याआधी तो बाधी 3 या चित्रपटात झळकला होता.
पाहा पोस्ट-
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! केस वाढवल्यानं शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
पिझ्झा कमी खाल्ल्यानं वजन कमी होतंय का?, साराने दिलं भन्नाट उत्तर
“स्त्रीयांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं, ही मानसिकता बदलावी लागेल”
Gold Rate: आजचे सोन्याचे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर
गोळीबाळानंतर ओवेसींच्या सुरक्षेत वाढ, आता देणार Z सेक्युरिटी