गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं ‘हे’ आव्हान

मुंबई | सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. कोणत्यानाकोणत्या कारणावर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीकास्त्र सोडले जात असते. यावरुन विरेधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आरो.प-प्रत्यारोपांची खेळी रंगत असती.

येत्या 16 मार्च रोजी औंढा येथे होणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून, पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. अशातच सरकारवर टीका करण्याचा एकही संधी न सोडणारे भाजपचे नेते आणि आमदरा गोपीचंद पडळकर यांनी यावेळी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

औंढा नागनाथ येथे होणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आम्ही करणार आहोत, असं गोपीचंद पडळकर यांनी घोषणा केली आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. गेल्या वर्षाभरापासून राज्याचे मुख्यमंत्र्यांना या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे सर्व समाजाच्यावतीने 16 मार्च रोजी आम्ही पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचंही सांगितलं आहे.

एवढच नाहीत पडळकरांनी कार्यक्रम करण्यायासंदर्भात पत्रिकाही जाहीर केली आहे. कार्यक्रम पत्रिका दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमासाठी वेळच नव्हता, असा आ.रोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. तसेच पडळकरांनी केलेल्या आरो.पांवर उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. पण त्याआधी 12 फेब्रुवारी रोजी पहाटेच गोपीचंद पडळकर यांनी पुतळ्याचे अनावरण करुन टाकलं. त्यामुळे राज्यात एकच चर्चांना उधाण आलं होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये पडळकरांच्या या कृत्यामुळे आणखी एक वादाची ठिंणगी पडली असल्याचं बोललं जात होतं.

महत्वाच्या बातम्या-

‘विराट मैदानात जितका आक्रमक आहे तितकाच तो…’; अनुष्काने सांगितलं ‘ते’ सिक्रेट

…अन् जुळता जुळता तुटलं; ‘तो हा नव्हेच’ म्हणत नवरीने लग्नमंडपातच मोडलं लग्न!

मनसुख हिरेन यांच्या मृ.त्यूनंतर त्यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

…अन् अशाप्रकारे गजा मारणे पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आजचे दर