“आज कुणीही पावसात भिजलं तरी काहीही उपयोग नाही, मविआ निवडणूक हरणारच”

मुंबई | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना पडळकरांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

काहीही झालं तरी महाविकास आघाडी विधान परिषद निवडणूक जिंकणार नाही. कुणी पावसात भिजलं तरी काहीही उपयोग होणार नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्यावेळी पाऊस पडला अन् ती निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली. यावरून पडळकरांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

सध्या पावसाळा सुरू आहे. मुंबईत धोधो पाऊस कोसळतोय. विधानपरिषदेची निवडणूक होतेय. पण आज कुणीही पावसात भिजलं तरी विजय भाजपचाच होणार, असं पडळकरांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिलं मत भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी नोंदवलं. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर…” 

अग्निवीरांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजप देणार नोकरी, ‘या’ नेत्याची मोठी घोषणा 

‘त्या मावळ्याचा बळी जाणार’; भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण 

3 आमदारांनी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली?; महत्त्वाची माहिती समोर  

“मी जिंकलोय याची आजच खात्री देतो, संध्याकाळी मुलाखत देईन”