औरंगाबाद | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वपक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यात एक बैठक झाली असल्याची माहिती समोर आलीये. यामुळे महाविकास आघाडीसोबत एकत्र येण्याची MIM ची तयारी असल्याचं बोललं जात आहे.
हे खरं आहे की ते भेटायला आले होते. माझ्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी ते आले होते. त्यावेळी आमच्यात चर्चा सुरू होती, असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.
आमच्यावर आरोप होतात की, भाजप जिंकते ते आमच्यामुळे जिंकते. तर मी त्यांना ऑफर दिली की, जर तुम्हाला हे संपुष्टात आणायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? पण त्यावर ते काही बोलले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
कुणालाही आम्ही नकोयत. फक्त मुस्लिमांची मते पाहिजेत. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही मुस्लिम मते हवी आहेत ना या मग आमच्यासोबत, असंही जलील यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 54 आमदार निवडून आले”
कोरोनाने पुन्हा टेंशन वाढवलं; गेल्या 24 तासातील रूग्णांची आकडेवारी समोर
मोदी सरकारचा सर्व राज्यांना अलर्ट, म्हणाले…
‘कॉपी करताना सापडल्यास…’; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
“भाजपचा शिमगा रोज सुरूये, आम्ही शिमगा सुरू केला तर…”