नाशिक | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका करताना पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. त्यांनी खालच्या भाषेत पवारांवर टीका केली आहे.
दोन वर्षापूर्वी विश्वासघातानी आम्ही विरोधी पक्षात बसलो. विरोधीपक्षामध्ये असलो तरी रडत बसलो नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहोत, असं पडळकर म्हणालेत.
इतके वर्ष कांद्याचा प्रश्न का मिटले नाहीत. याच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना गोळ्या घालण्यात आले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या …वर लाथ घाला असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याचंही पडळकर म्हणालेत.
लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील आणि त्यावेळेस त्यांना कांद्याचा वास दाखवा ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असं वादग्रस्त वक्तव्य पडळकर यांनी केलंय.
सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असताना देखील सध्याचं सरकार काही करत नाहीये. केंद्राला प्रस्ताव पाठवा आम्ही तुमच्यासोबत येतो. गुजरात सरकारने जर किलोमागे कांद्याला 3 रुपये अनुदान देत असेल तर मग तुम्ही का देत नाही. महाराष्ट्रात देखील कांद्याला आता 5 रुपये अनुदान द्यावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली.
उद्धव ठाकरे,अजित पवार तुम्ही इथे येऊन पहा. तुम्हाला दारूवर खूप प्रेम आहे ग्लास मध्ये कांद्याचे ज्युस भरून पाजणार, आमचा ज्युस प्यायला तर कपडे काढून नाचाल, अशी टीकाही खोत यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना नोकरी मिळणार नाही”
शाळा पुन्हा बंद होणार का?; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती
“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही”
केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा!
“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही”