“मी वाघाचा मुलगा आहे, नरेंद्र मोदींना सत्तेतून हाकलून देईन”

नवी दिल्ली | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरु असलेली पहायला मिळत आहे. के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

जानगावमध्ये चंद्रशेखर राव एका नवीन इमारतीच्या उद्धाटनासाठी गेले होते. उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला.

एनडीए सरकार तेलंगणाच्या विकासासाठी मदत करण्यात अपयशी ठरले आहे, असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं. पुढे ते उपस्थित लोकांना म्हणाले की, तुम्ही मला आशीर्वाद दिला तर मी पंतप्रधान मोदींना सत्तेतून हाकलवून देईल.

मोदींविषयी केलेल्या या वक्तव्यामुळे चंद्रशेखर राव चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर टीकास्त्र ही सोडलं जात असल्याचं पहायला मिळत आहे.

चंद्रशेखर राव यांनी यावेळी बोलताना विकासाच्या मुद्द्यालाही हात घातला. तुम्ही आम्हाला राष्ट्रीय प्रकल्प देत नाहीत. तुमचा पाठिंबा नाही मात्र तुम्ही अडचणी नक्की निर्माण करता, असंही चंद्रशेखर राव यांनी म्हटलं.

तुम्ही आम्हाला भारतातून हाकलून देणार त्यापेक्षा आम्ही दुसरं सरकार आणू असंही चंद्रशेखर राव यांनी म्हटलं. त्यामुळे सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“चंद्रकांत पाटील मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बोलणं योग्य नाही”

“जेवढं भुंकायचं तेवढं भुंका, करारा जवाब मिलेगा!”

“पवार शिवसेना नेत्यांना योग्य वागणूक देत नाहीत, निधी देताना त्यांच्यात उपकाराची भावना असते”

“पंतप्रधान मोदीजी, हे भाजपचे संस्कार आहेत का? माझी मान शरमेनं झुकली आहे”

“शिवसेनेच्या मनात काय चाललंय हे सांगायला मी ज्योतिषी नाही”