तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

नवी दिल्ली | सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 25 एप्रिल ही ईशान्य रेल्वेमधील या विविध गट सी पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही ते भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट ner.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

तुम्ही https://ner.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचनाही पाहू शकता.

एकूण 21 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची तारिख 26 मार्च तर अंतिम तारिख 25 एप्रिल आहे. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

दरम्यान, चाचणीमधील कामगिरी आणि क्रीडा आणि शैक्षणिक पात्रतेच्या मूल्यांकनाच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 र्षांच्या दरम्यान असावी.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला’; फडणवीसांनी सांगितलं कारण 

“मी खालच्या जातीची आहे म्हणत मला जेलमध्ये पाणी दिलं जात नाहीये”

  ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर…’; संजय राऊतांचा हल्लाबोल

  ‘राष्ट्रपती राजवट लागू करा…लै मजा येईल…’; राष्ट्रवादीच्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

 येत्या पाच दिवसांत ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज