मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर असलेले भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारल 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता.
राज्य सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांनतर गृहमंत्री दिलिप वळसे पाटलांनी पत्रकार परिषदेत भोंग्यासंदर्भातला निर्णय केंद्र सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचं म्हटलं आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याने संपुर्ण देशाला तो लागू होतो. त्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर निर्णय घ्यायला हवा, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास प्रत्येक राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती राहणार नाही. सर्व पक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटावे, असं आवाहनही दिलिप वळसे पाटलांनी केलं आहे.
राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत, त्या दृष्टीकोनातून कारवाई करावी, अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही आलो आहोत, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
लाऊडस्पीकर वापरासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डेडलाईन दिली आहे. मात्र, कायद्यामध्ये सरकारने भोंगे लावणे आणि उतरवणे यासंदर्भात कोणतीही तरतूद नाही, असं त्यांनी सांगितलं.
ज्यांनी भोंगे लावले आहेत. त्यांनी त्याठिकाणची काळजी घ्यावी, असं दिलिप वळसे पाटलांनी म्हटलं आहे. ज्यावेळेस विशिष्ट समाजाच्या बाबत भूमिका घेतली जाते त्याचा इतरांवर परिणाम होतो, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात दररोज किंवा काही अंतरावर भजन, किर्तन आणि पहाटेची काकड आरती सुरू असते. नवरात्रोत्सव आणि गणपती उत्सव असतात. गावाकडे यात्रा असतात. कायदा समान मानला तर सर्वांसाठी एक भूमिका घ्यावी लागेल, असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला’; फडणवीसांनी सांगितलं कारण
“मी खालच्या जातीची आहे म्हणत मला जेलमध्ये पाणी दिलं जात नाहीये”
‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर…’; संजय राऊतांचा हल्लाबोल
‘राष्ट्रपती राजवट लागू करा…लै मजा येईल…’; राष्ट्रवादीच्या नेत्याचं खळबळजनक ट्विट
येत्या पाच दिवसांत ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज