मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढल्यानंतर इथे काहीच पैसा उरणार नाही- राज्यपाल

मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsing Koshyari) यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबईत पैसा राहणार नाही. मुंबई देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा गमावून बसेल, असं राज्यपाल म्हणालेत. त्यांचं हे वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. या त्यांच्या वक्तव्यात त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचं सर्व राजकीय पक्षातील लोक बोलत आहे.

राज्यपाल कोश्यारी हे शुक्रवारी (दि. 29 जुलै) रोजी जे. पी. मार्ग, अंधेरी (प.), मुंबई येथील दाऊद बाग (Dawood Baug) जंक्शन येथील चौकाचा नामकरण आणि उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते. या चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी (Shantidevi Champalalji Kothari) यांचं नाव देण्यात आलं आहे.

सदर सोहळ्याप्रसंगी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साठम, भारती लवेकर, पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा आणि उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी आदी लोक उपस्थित होते.

त्यावर आता राज्यपालांवर राजकीय वर्तुळात टीकांचा पाऊस पडत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्याचे राज्यपाल त्याच राज्याची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनांच सर्वाच अगोदर नारळ दिला पाहीजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अपमानही सातत्याने झाला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना महाराष्ट्रातील आणि जगातील सर्वात मोठे वादग्रस्त राज्यपाल म्हटलं आहे. त्यांनी मुंबईचा अपमान करु नये, त्यांना हे अधिकार कोणी दिले?, असा त्यांनी प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, ठाणे न्यायालयात तक्रार दाखल

‘संजय राऊतांवर मी कशाला कमेंट करू?’, शरद पवारांचा सवाल

“अलिकडे सेक्स कधी केला?”; अनन्याच्या उत्तरानं करण जोहर हैराण!

स्मृती इराणींच्या याचिकेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसला फटकारलं, दिले ‘हे’ आदेश

“फडणवीसांचं हे ट्विट म्हणजे मुह मे राम और बगल मे छुरी”