‘कोश्यारींची होशियारी’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंनी झापलं

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी अंधेरी येथे एका चौकाच्या उद्घाटणप्रसंगी एक भाषण दिले. त्यात त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर नव्या वादाला तोंड फूटले आहे.

मुंबईतील आणि ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढले, तर मुंबईत पैसा रहाणार नाही आणि मुंबईचे (Mumbai) देशातील आर्थिक राजधानी असलेले महत्व सुद्धा निघून जाईल, असं राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले होते.

त्यावर सर्वच स्तरांतून टीका केली जात आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यावर भाजपेत्तर पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यात आता मनसे (MNS) पक्षाने देखील उडी घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोश्यारींची होशियारी या मथळ्याखाली त्यांना उल्लेखून पत्र लिहीलं आहे.

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचं पद आहे. म्हणून आपल्या विरुद्ध बोलायला लोक कचरतात. पण आपल्या वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रातील मराठी माणसाने येथील मन आणि जमीन मशागत करुन ठेवल्यामुळे तर इतर राज्यातील आले आणि येत आहेत ना! दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकांच्या तोंडावर कोणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करु नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकेच आता आपल्याला सांगतो, अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

त्यांच्या या पत्राची बरीच चर्चा आहे. त्यामुळे आता भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष राज्यपालांच्या या वक्तव्याची कशाप्रकारे पाठराखण करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि भाजप पक्ष त्यांच्यावर कोणत्या कारवाईची मागणी करणार का?, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या –