आजीने आजोबांना केलं किस; आजोबांनी जी प्रतिक्रिया दिली ती पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क आजीने आजोबांना किस केलं आहे.

एक आजी आणि आजोबा एका ठिकाणी बसले आहेत. आजोबांनी पांढऱ्या रंगाचं धोतर आणि फेटा घातला आहे आणि त्यांच्या हातात एक काठीही आहे. आजीने हिरव्या रंगाची साडी नेसली असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

आपल्याला माहित आहे की, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफोर्मवर सध्या रिल्सचा ट्रेंड सुरू आहे. कोणत्याही व्हिडीओला साजेस गाणं लावून आजकाल सगळेच शेअर करत असतात.

याच पद्धतीने व्हायरल झालेला आजी-आजोबांचा व्हिडीओ देखील केला असल्याचं दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये आजीने आजोबांच्या लक्षात यायच्या आधीच त्यांच्या गालावर किस केलं.

हे कळताच आजोबांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी होती. ज्याप्रकारे एखादा नव जोडप्यातील नवरी लाजत असते. अगदी तसंच आजोबाही लाजत असल्याचं व्हिडीमध्ये पाहायला मिळतं आहे. आजी-आजोबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CTCkEBqJGdr/?utm_source=ig_embed&ig_rid=572652b0-379a-45e7-b2c8-369a3a954549

महत्वाच्या बातम्या-

एका ग्लासामुळे नवरदेवाचं आलं खरं रूप समोर, पाहा व्हिडीओ

लग्न झाल्याच्या खुशीत नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

आपल्या मृत मुलाला सोंडेत घेऊन जातानाचा हत्तीणीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक

पती राज कुंद्रासाठी शिल्पाचा अनोखा नवस, घोड्यावर बसून देवीच्या दर्शनाला

…म्हणून भर ऑफिसमध्ये बहिणीनेच बहिणीला धो धो धुतलं, पाहा व्हिडीओ