नवी दिल्ली | नवीन वर्ष अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलं आहे. सरत्या वर्षाला गुडबाय करत नवीन वर्षाचं स्वागत करायला सर्वजण सज्ज झाले आहेत.
नवीन वर्षात अनेक जण वेगवेगळे संकल्प करतात. पण नवीन वर्षी बजेटची आखणी करून त्या पद्धतीने सेव्हिंग करण्याचा जवळपास सर्वांचाच संकल्प असतो.
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच अनेकांचं बजेट कोलमडणार आहे. 1 जानेवारीपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने कपडे आणि फूटवेअर या वस्तूंवरील GST मध्ये वाढ केली आहे. जीएसटीचा नवीन दर 1 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीच्या मालावर लागू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सप्टेंबर महिन्यात जीएसटी परिषदेची बैठक पार पडली होती. या बैठकीत काही वस्तूंवरील जीएसटीचा दर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता कपडे आणि चपलांच्या किमती वाढणार आहेत.
नवीन वर्षात अर्थात जानेवारी 2022 पासून 1 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीच्या कपड्यांवरील GSTचा दर 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे.
कपड्यांसह जोड्यांवरही हेच दर लागू होणार आहेत. यासोबतच हातमागावर विणलेल्या कपड्यांच्या दरातही वाढ होणार आहे. जीएसटीच्या नव्या दरामुळे कपडे शिवणेही महागणार आहे.
सरकारने शिलाईसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या धाग्यांवरील जीएसटीदेखील वाढवला आहे. त्यामुळे कपडे खरेदी करणे आणि कपडे शिवणे दोन्ही महागणार आहे.
जीसएसटीचे दर वाढल्याने याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर होणार आहे. त्यामुळे अनेकांचं बजेट कोसळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…तर आम्ही 20 कोटी मुसलमान लढू”; नसिरूद्दीन शहांचं वक्तव्य चर्चेत
“मी अजित पवारांना…”, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा मोठा खुलासा
जेवल्यावर लगेचच झोपत असाल तर सावधान! वाढतोय ‘या’ गंभीर आजाराचा धोका
अखेर ओमिक्राॅनवर उपाय सापडला, शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश
राज्यपाल कोश्यारी म्हणतात, “महात्मा गांधींच्या सत्याग्रहापूर्वीच इंग्रजांनी…”